न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर विद्यालयामध्ये साथीच्या आजारांबद्दल मार्गदर्शन
LoktantraNews24
प्रतिनिधी:प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेबोल्हाई येथील डॉक्टर अमोल पारध आणि युवराज चव्हाण यांनी न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर विद्यालयातील विद्यार्थ्यांना दूषित पाणी आणि डासांमुळे होणाऱ्या विविध आजारांबद्दल मार्गदर्शन केले.
डॉक्टरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,जेथे साचते पाणी तेथे वाढती डास. डेंग्यू, चिकुनगुनियाची येते साथ.एडिसी इजिप्सी हा डेंग्यू, चिकुनगुनियाचा डास दिवसा चावतो. त्यामुळे आपले घर व कामाच्या ठिकाणी डास वाढणार नाहीत याची काळजी घ्या.या डासांची पैदास घरगुती पाणीसाठे, टाक्या, हौद, फुलदाण्या, भंगार साहीत्य व टायरमधील पाणी, फ्रिजचा ट्रे, कुलर, बांबु प्लैंट, कुंड्या, नारळाच्या करवंट्या इत्यादी ठिकाणी साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते.डेंग्यू आजाराची लक्षणे तीव्र ताप, ढोके दुखी, स्नायू दुखी, डोळ्याच्या आतील बाजूस दुखणे, भूक मंदावणे, अंगावर पुरळ आढळणे, त्वचेखाली व नाकातून रक्त येणे. पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे.
चिकुनगुनियाची लक्षणे कमी मुदतीचा तीव्र ताप,डोकेदुखी, अंगदुखी, तीव्र सांधेदुखी, अंगावर पुरळ आढळणे अशी लक्षणे ७ ते १० दिवस.घरगुती वापरातील पाणी साठ्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा रिकामी करुन पासून, पुसून, कोरडी करुन पुन्हा वापरावी, भंगार सामान, निरुपयोगी टायर्सची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. वैयक्तीक सुरक्षिततेसाठी मच्छरदाणीचा वापर, डास प्रतिबंधक क्रिम, लिकीड अथवा कॉईलचा वापर करावा.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे सहशिक्षक बाळासाहेब ढवळे तर मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी केले.