अष्टापूर विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरण पूरक राख्या
LoktantraNews24
प्रतिनिधी:आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर संचलित, न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर ( हवेली ) विद्यालयात विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून उपक्रमातील आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या पर्यावरण पूरक राख्या बनवल्या. यावेळी त्यांनी अनेक राख्या तयार करून शालेय परिसरातील झाडांना बांधल्या. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या पर्यावरण पूरक राख्या तयार करण्याच्या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यालयाच्या प्रांगणात या उपक्रमाचे लहान गट व मोठा गट असे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी सूचित केलेल्या नियोजनानुसार करण्यात आले होते. रक्षाबंधनानिमित्त राखी तयार करणे हा एक आगळावेगळा उपक्रम विद्यालयात राबविण्यात आल्याचे मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी उत्तम,उत्कृष्ट राख्या बनवणाऱ्या विद्यार्थ्यांचे क्रमांक काढून त्यांना गौरविण्यात आले.
लहान गट
प्रथम क्रमांक
1) प्रियल दौलत कोतवाल ,ऐश्वर्या किसन गुंडे
द्वितीय क्रमांक –
1) आर्या गणेश कोतवाल 2) आरोही रणजीत कोळपे
तृतीय क्रमांक-
1) सई निलेश कोतवाल 2) स्वरा संदीप मेमाणे
उत्तेजनार्थ —
1) श्रेयस सोमनाथ मेमाणे 2) सोहम संजय पवार 3) आर्वी सोमनाथ कोतवाल
मोठा गट
प्रथम क्रमांक
1) अबोली अनिल लोणारी 2) यशश्री हनुमंत मेमाणे
द्वितीय क्रमांक
1) नारायणी कालिदास कोतवाल 2) श्रद्धा स्वामी
तृतीय क्रमांक
सार्थक पोपट कोतवाल
उत्तेजनार्थ
आदित्य महेंद्र धारणे
यावेळी राख्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. राखी बनविण्याच्या स्पर्धेचे परीक्षण विद्यालयातील सहशिक्षक अनिल कुंजीर, सविता शितोळे, सुशीला सातपुते,सुरेश देशपांडे, सुरेखा दरेकर,सौ तांबे मॅडम, बाळासाहेब ढवळे,नवनाथ भागवत, चौरंगनाथ कामथे, सुहास भुजबळ, सुरेश ओंबळे, अमर वारे, सौ कांबळे सौ गायकवाड सौ कोतवाल यांनी केले. स्पर्धेचे आयोजन आणि नियोजन करायचं मुख्याध्यापक सुभाष काळे, विभाग प्रमुख हरिश्चंद्र खेडेकर व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले . मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन हरिचंद्र खेडेकर यांनी व आभार सुरेश ओंबळे यांनी मानले.