जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलकवाडी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
LoktantraNews24
प्रतिनिधी:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलकवाडी पिंपरी सांडस येथे भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेतील ध्वज पूजन अध्यक्ष रॉनी सल्डाणा एडवोकेट पुणे यांच्या हस्ते तर सरस्वती प्रतिमा पूजन युपीएल कंपनी चे बिझनेस मॅनेजर संदीप राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मोडक तसेच उपाध्यक्ष तुषार सूर्यवंशी तसेच पिंपरी सांडस चे उपसरपंच माननीय मंगेश शेठ गवारे, उपसरपंच रामभाऊ शिंगटे, माजी अध्यक्ष गणपत गायकवाड माजी अध्यक्ष गणेश तोडकर ,अमोल लोणारी ,आकाश लोणारी ,आकाश गावडे ,महेंद्र श्रीराम ,सुधीर पिंगळे, शिवप्रसाद कंकरवाल ,अमोल शेठ भोरडे ,पत्रकार सुखदेवराव भोरडे, बापूसाहेब लोणारी ,अमित श्रीराम, सर्व विद्यार्थ्यांचे पालक वर्ग तसेच महिला भगिनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या.
शाळेतील छोट्या मुलींनी गुलापुष्प देऊन स्वागत केले.स्वराज चितलकर या विद्यार्थ्याने शिस्तबद्धः संचलन करून पाहुण्यांना मंचाकडे आणले. चिमुकल्या बाल विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य विषयी इंग्रजी, मराठी ,हिंदीतून भाषणे सादर केली. सांस्कृतिक कार्यक्रम आणि डनबेल्स साहित्य कवायत मुलानी केली. युपीएल कंपनी तर्फे फळझाडे शाळेला भेट देण्यात आली.या झाडांचे रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पुणे जिल्हा परिषद ग्राम आरोग्य निरीक्षक श्री दत्तात्रय चोरमले यांनी शाळेचे,मुलांचे भरभरून कौतुक केले.पालक वर्ग व मान्यवरांनी मुलांना खाऊ दिला तसेच ११००० रुपये वर्गणी दिली.शेवटी पत्रकार श्री सुखदेव भोरडे यांनी आभार मानले. शाळेचे शिक्षक श्री लोणारी सर,श्रीमती आव्हाळे मॅडम,अंगणवाडी सेविका श्रीमती लोणारी मॅडम आणि तोडकर मॅडम यांनी नियोजन उत्तमरीत्या केले होते.