आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर विद्यालयामध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

LoktantraNews24

New english school ashtapur

प्रतिनिधी:आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर (तालुका हवेली) या विद्यालयामध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या असंतोषाचे जनक असणारे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि महाराष्ट्राचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.

विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की सार्वजनिक उत्साहातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारे स्वातंत्र्य सेनानी, पत्रकार आणि थोर समाजसेवक म्हणजे लोकमान्य टिळक. क्रांतीची मशाल पेटवली ,स्वराज्यासाठी सिंहगर्जना केली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली.

अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की अण्णाभाऊंचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे. ते क्रांतीचे जनक, लोकसाहित्याचे शिल्पकार, लेखक, समाजसुधारक, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला कादंबरीकार लोकनाट्यकार भारताचे पहिले लेखक ज्यांचे साहित्य हिंदी, गुजराती ,ओडिया, बंगाली ,तमिळ, मल्याळी इत्यादी भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाले. तर परकीय सत्तावीस भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे भाषांतर करण्यात आले .त्यांनी एकूण 37 कादंबऱ्या, 11 कथासंग्रह, 11 लोकनाट्ये, सात चित्रपटकथा ,दोन नाटके आणि दहा पोवाडे लिहिले .त्यांची फकीरा ही कादंबरी विशेष गाजली. विद्यालयातील सिद्धी कोतवाल आणि श्रावणी निकाळजे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता सहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांची चित्रे रेखाटली. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सुशीला सातपुते तर आभार प्रदर्शन सुषमा दरेकर यांनी केले.

संपादक: सुखदेव भोरडे

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.