आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात इयत्ता 12 वीची पालक सभा

LoktantraNews24

प्रतिनिधीःजोगेश्वरी माता . माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात इयत्ता 12 वीची पालक सभा संपन्न वाडे बोल्हाई येथील जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जुनिअर कॉलेज विभागात शनिवारी इयत्ता 12 वी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील प्रथम पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पालक व विद्यार्थी यांनी चांगला प्रतिसाद दिला

सदर सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच श्री कुशाभाऊ गावडे हे होते. प्राचार्य धुमाळ सर यांनी कार्येक्रमाचे प्रास्ताविक केले. कॉलेज जीवनात मोबाईल वापर टाळावा असे धुमाळ सरांनी सांगितले. पालक सभेस प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार श्री बापूसाहेब पठारे होते. व शाळा समितीचे अध्यक्ष श्री विद्याधर बापू गावडे होते. सदर प्रसंगी आमदार श्री बापूसाहेब पठारे यांनी पालक व विद्यार्थ्यांना भविष्य, शिस्त, नोकरी संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.

श्री विद्याधर बापू गावडे यांनी जुनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांनी कुठलाही ताण न घेता.मोकळ्या वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करून स्वतःला प्राध्यापक शिक्षकांच्या मार्गदर्शनाने स्वतः घडावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्येक्रमाचे अध्यक्ष श्री कुशाभाऊ गावडे यांनी पालक, विद्यार्थी यांना व्यसनाधीनता पासून दूर राहावे. वक्तशीरपणा, अभ्यास शालेय शिस्त या बाबत मार्गदर्शन केले.पालकांनी काही मोचक्या सूचना मांडल्या अत्यन्त खेळी मेळीच्या वातावरणात पालक सभा संपन्न झाली.

 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा फलके सर, तर आभार प्रा मेंगडे सर यांनी केले तसेच प्रा चौधरी सर, प्रा पवार सर,प्रा नरके मॅडम, प्रा वाघमारे सर, प्रा नवले मॅडम, प्रा पठारे मॅडम, प्रा अमर गायकवाड सर व शिक्षकेत्तर वर्ग यांनी कार्येक्रमाचे योग्य नियोजन केले.पूर्व हवेली भागातील विद्यार्थी शिकावेत, दर्जेदार शिक्षण भेटावे वेळ बचत व्हावी या साठी

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार विजेते श्री पंढरीनाथ तथा आण्णासाहेब पठारे व वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी वाडे बोल्हाई ता हवेली या ठिकाणी इंग्लिश माध्यम शाळा, प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा,जुनिअर कॉलेज ( कला, वाणिज्य व विज्ञान ) व वरिष्ठ महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय म्हणजे B. A., B. Com व B. Sci विद्यालय सुरु आहेत. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

संपादक: सुखदेव भोरडे

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.