आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठाण पुरंदर संचलित, न्यु इंग्लिश स्कुल अष्टापूर, विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी सुभाष काळे
LoktantraNews24
प्रतिनिधी :दौंड तालुक्यातील पारगाव ,शिंदेवाडी येथील सुभाष काळे यांची न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर विद्यालयाचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक म्हणून निवड झाल्याबद्दल आचार्य विकास प्रतिष्ठान पुरंदर चे अध्यक्ष विजयराव कोलते आणि सर्व आजी-माजी पदाधिकारी व पारगाव चे ग्रामस्थांनी जाहीर सत्कार केला. तसेच आई-वडिलांची वयाची 95 वर्षे पूर्ण होत असल्याने अभिष्टचिंतनाचाही कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी बोलत असताना विजयराव कोलते यांनी समाज घडवण्यासाठी चांगल्या शिक्षकांची नितांत गरज असते. शिक्षकांची नाळ समाजाशी उत्तम प्रकारे जोडलेली हवी. स्वतःच्या कुटुंबातील आई-वडील आणि ज्येष्ठांचे काळजी घेणारे सुभाष काळे सर हे एक आदर्श शिक्षक आहेत असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रम प्रसंगी विविध मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले. यामध्ये आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर या संस्थेचे सचिव शांताराम पोमण, श्रीहरी कोतवाल, यशवंत सहकारी साखर कारखाना चे चेअरमन सुभाष अप्पा जगताप,सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब मुळीक सर, सर्जेरावकाका जेधे, नानासाहेब जेधे, सरपंच सुभाष बोत्रे,माऊली अण्णा ताकवणे ऐश्वर्या मांगडे ,रघुनाथ चौधरी यांनी सुभाष काळे यांना मुख्याध्यापक पदासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रम प्रसंगी यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरचे चेअरमन सुभाष जगताप, रमेश कोतवाल, तुकाराम ताकवणे,मच्छिंद्र ताकवणे, सुरेश ताकवणे, संभाजी तात्या ताकवणे,संतोष ताकवणे,बाळू काका रुणवाल, मुख्याध्यापक रामचंद्र नातू सर, सुनील ताकवणे सर विठ्ठल शिशुपाल सर, सुशीला ताई मांगडे, हंबीरराव जेधे, अरुण कोलते, बाळासाहेब कोलते सुहास भुजबळ गुणवंत कोतवाल शांताराम कोलतेआणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.समस्त काळे परिवार शिंदेवाडी व समस्त ग्रामस्थ पारगाव यांच्यातर्फे ही सुभाष काळे सरांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक दौंड पंचायत समिती चे माजी उपसभापती सयाजीअण्णा ताकवणे यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन बाळासाहेब ढवळे यांनी केले तर आभार नामदेव काळे यांनी मानले.