अष्टापूर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
LoktantraNews24
प्रतिनिधी:आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर तालुका हवेली विद्यालयात भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील ध्वज पूजन शाळा समितीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल, नियामक मंडळाचे सदस्य रमेश कोतवाल, अष्टापुर गावच्या सरपंच पुष्पाताई कोतवाल , उपसरपंच संजय भिकू कोतवाल,विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष अतुल कोतवाल, सुरेश कोतवाल,शामराव वारे, तयाजी जगताप, विजय कोतवाल आणि नितीन मेमाणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी उपसरपंच सोमनाथ कोतवाल,शिवाजी कोतवाल, उद्योगपती पोपटकोतवाल , संतोष गणपत कोतवाल. पोलीस पाटील कैलास कोतवाल,नवनाथ कोतवाल, किरण कोतवाल, रमेश आबासाहेब कोतवाल, महेश ढवळे ,केतन निकाळजे, , राजेंद्र कोतवाल, मनोज कोतवाल आणि अष्टापुर गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
अष्टापूर विद्यालयाचे ध्वजारोहण शाळा समितीचे सदस्य विजय कोतवाल यांच्या हस्ते झाले.
त्या नंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ,ध्वजगीत व महाराष्ट्र दिन याचे गायन केले. राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे संचलन सादर केले. त्याचबरोबर विद्यालयातील जवळपास 800 विद्यार्थ्यांनी कवायत प्रकार सादर केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष काळे सर यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल शुभेच्छा व शाळेच्या कामकाजाबद्दल प्रास्ताविक केले. शाळा समितीचे सदस्य विजय कोतवाल यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल देशभक्त व क्रांतिकारक यांचेअसणारे योगदान स्पष्ट करून स्वातंत्र्य दिनाबद्दल शुभेच्छा दिल्या. न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अष्टापुर व अंगणवाडी अष्टापुर यांच्या सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गावातून प्रभात फेरी काढली.
ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय यांचे ध्वजारोहण करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व समूह गीते सादर केली. विद्यालयातील व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी
स्वातंत्र्य दिनाबद्दल भाषणेही केली . त्यांच्या अप्रतिम भाषणाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांना रोख स्वरूपात भरघोस असे पारितोषिकही देण्यात आले. अष्टापुर ग्रामस्थांच्या वतीने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी चांगले यश मिळवल्याबद्दल बक्षिसे देण्यात आली. न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर विद्यालयातील इयत्ता दहावी मार्च 2024 व मार्च 2025 परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या वतीने रोख रक्कम स्वरूपात पारितोषिकही देण्यात आले. विद्यालयातील माजी विद्यार्थिनी कुमारी दिव्या अजय कोतवाल हिची पोलीस दलात निवड झाल्याने तिचाही ग्रामस्थ, विद्यालयाच्या वतीने शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.79 स्वातंत्र्य दिनासाठी व अष्टापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ ,महिला आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वाना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले सूत्रसंचालन बाळासाहेब ढवळे यांनी तर आभार शांताराम कोलते यांनी मानले.