न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर विद्यालयामध्ये श्रावणी सहल संपन्न
LoktantraNews24
प्रतिनिधी:आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर (तालुका हवेली) या विद्यालयामध्ये श्रावणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
या सहली निमित्त अष्टापुर परिसरातील श्रीरामनगर येथील जय बाबा मंदिर आणि परिसरास विद्यालयातील सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पायी भेट दिली. या ठिकाणी वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यामध्ये गीते, अभंग,पोवाडे आणि गवळणींचे सादरीकरण करण्यात आले. जय बाबा मंदिर ट्रस्टचे श्री दीपक कोतवाल, रमेश कोतवाल, नवनाथ जगताप, भीमराज कोतवाल, प्रसाद कुंजीर विनायक कोतवाल, योगेश कोतवाल यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना केळी आणि लाडूचे वाटप केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष काळे यांचा सत्कार जय बाबा ट्रस्टच्या वतीने करण्यात आला.
सहल विभागाचे प्रमुख चौरंगनाथ कामथे, सुहास भुजबळ, सुषमा दरेकर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सदर श्रावणी सहल यशस्वी होण्यासाठी नियोजन केले. विद्यालयाचे सहशिक्षक बाळू ढवळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.