आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

LoktantraNews24

प्रतिनिधी:आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल,अष्टापुर, ता. हवेली येथील सन 2005-2006 मधील दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल 19वर्षांनी आयोजित करण्यात आला होता.स्नेहमेळाव्याचे वर्ग मित्रांनी आयोजन केले होते. या वेळी सर्वांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

19वर्षांनी सर्व जण एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या वेळी प्रत्येक जणाने शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांशी दिलखुलास संवाद साधला. हा स्नेहमेळावा म्हणजे आमच्यासाठी अनमोल ठेवा असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. पुढील काळात आपल्या मैत्रीची ठेव वृद्धिंगत अशीच वाढत राहील अशी आशा प्रत्येकाने व्यक्त केली.

सामाजिक बांधिलकी जपून विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी साऊंड सिस्टिम भेट दिली. राष्ट्रप्रेम व राष्ट्रविकासाकरिता हातभार लावण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणारे स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की सुमारे 35 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या विद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये कार्य करत आहेत हे पाहून समाधान वाटते .याचसाठी केला होता अट्टाहास. जीवन जगत असताना आपण समाजाचे सुद्धा काही देणे लागतो ही भावना विद्यार्थ्यांनी मनामध्ये सतत तेवत ठेवावी.

या वेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी घोगरे, अनिल क्षीरसागर ,विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष काळे, सहशिक्षक बाळू ढवळे ,सुहास भुजबळ, अरुण यादव,सुशीला मेमाने, सुषमा दरेकर,शरद चौधरी, स्कूल कमिटीचे सदस्य विजय कोतवाल आदींनी मनोगत व्यक्त केले. आपले सर्व विद्यार्थी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. राष्ट्रविकासाकरिता हातभार लावत आहेत हे पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन तेजश्री सातव आणि राहुल दि कोतवाल यांनी केले. सोमनाथ गायकवाड, मयूर कोतवाल, शरद गोते, राहुल दि कोतवाल ,गणेश आप्पा कोतवाल, दिपाली गावडे, साठे गणेश,मोहिनी सातव,नामदेव कोतवाल शरद कोतवाल आदींनी संयोजन केले. गावचे पोलीस पाटील कैलास कोतवाल यांनी आभार मानले.

संपादक: सुखदेव भोरडे

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.