आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

 न्यु इंग्लिश स्कूल अष्टापुर विद्यालयामध्ये दिंडी सोहळा संपन्न. 

LoktantraNews24

 

प्रतिनिधी:अष्टापूर विद्यालयामध्ये पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमाचे सुरुवातीस न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर विद्यालयाचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल यांनी शुभेच्छा पर मनोगतातून वारकरी संप्रदायाचा महिमा वर्णन केला.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून कपाळाला अबीर बुक्का लावून ज्ञानोबा तुकाराम, माऊली ,माऊली ,विठ्ठल, विठ्ठल असा उद्घोष करत संपूर्ण गावांमध्ये ग्राम प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली.

गावातील महादेवाच्या मंदिरासमोर अतिशय भक्तीपूर्ण अशा वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी काही अभंग, गवळणी सादर केल्या. सदर कार्यक्रम प्रसंगी टाळाच्या गजरात विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी फुगडी चा आनंद घेतला. सर्व मुलांना खाऊ वाटप केल्यानंतर दिंडी सोहळ्याची सांगता झाली. सदर कार्यक्रमास न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर विद्यालयाचे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

संपादक: सुखदेव भोरडे

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.