अर्थकारणआपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्राईम स्टोरीक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

लोणीकंद पोलीसांनी खरेदीचा बहाणा करुन जबरीने सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरटयास केले जेरबंद

LokTantraNews24

प्रतिनिधी:लोणीकंद पोलीस ठाणे हददीत दिनांक २८/११/२०२४ रोजी एका अनोळखी इसमाने मोटर सायकल स्वाराने पिंपरी सांडस येथील महिलांच्या कपडे विक्री दुकानातील महिलेच्या गळयातील मंगळसुत्र जबरदस्तीने चोरी केल्याने लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ११२४/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाच्या तपासात मा पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, पुणे श्री, हिमत जाधव साो, मा. सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्रीमती प्रांजली सोनवणे, व लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री सर्जेराव कुंभार यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देउन तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. रविंद्र गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक व तपास पथकातील स्टाफ यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.
नमुद गुन्हयाच्या तपासात सहायक पोलीस निरीक्षक, श्री रविंद्र गोडसे, पोलीस शिपाई १०५९४ माने, पोलीस शिपाई १०२७३ सपुरे, पोलीस शिपाई ४५८५ रोकडे, पोलीस शिपाई ढोणे, पोलीस शिपाई शिवले, यांनी पिंपरी सांडस, कोरेगाव भिमा, लोणीकंद, वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी, हडपसर, फुरसुंगी, मगरपटटा, घोरपडी, कल्याणी नगर, येरवडा परिसरातील आरोपींचे पळुन जाण्याचे मार्गावरील एकुण ८० ते १०० खाजगी सीसीटिव्ही कॅमेरे तपासुन सीसीटीव्ही फुटेज मधील अनोळखी आरोपीच्या वर्णनावरुन व आरोपीतांबाबत गोपनीय बातमीदारा मार्फतीने कौशल्यपुर्वक माहिती प्राप्त करुन आरोपी रोहन सतिश जाधव, वय २८ वर्षे रा. फलॅट नं.१०२, दवारका बिल्डींग, हरपळेनगर, फुरसुंगी रोड, हडपसर, पुणे यास कॉमर्स झोन, येरवडा परिसरात गुन्हयात वापरलेल्या मोटार सायकलसह ताब्यात घेवुन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत चैन चोरी केली असल्याची कबुली दिल्याने त्याचेकडुन एकुण १, ७८, ०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. नमुद आरोपीस दिनांक अटक करण्यात आलेली असुन श्री. रविंद्र गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर मो नं. ८०८२०७७१०० हे गुन्हयाचा पुढील अधिक तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री अमितेशकुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. मनोजकुमार पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. हिमत जाधव, पोलीस उपआयुक्त साो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्रीमती प्रांजली सोनावणे मॅडम, सहा. पोलीस आयुक्त साो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सर्जेराव कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. रविंद्र गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार सागर जगताप, कैलास साळुंके, अजित फरांदे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, साईनाथ रोकडे, अमोल ढोणे, शुभम चिनके, सुधीर शिवले यांनी केली आहे.

संपादक: सुखदेव भोरडे

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.