आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक
पिंपरी सांडस, न्हावी सांडस, सांगवी सांडस तिन्ही गावांचा वायरमन चा जटील प्रश्न सोडवण्यात यश..
LoktantraNews24
प्रतिनिधी:गेल्या आठवड्याभरापूर्वी कार्यकारी अभियंता मा. बैंकर साहेब यांना वायरमन बदली संधर्भात लेखी निवेदन देऊन याबद्दल व्यथा मांडली होती. सदर विषयाचा गांभीर्याने विचार करून आपल्या तिन्ही गावांना आजपासून नवीन वायरमन श्री.गव्हाणे यांची वायरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्याबद्दल त्यांचा तीनही गावांच्या वतीने आष्टापूर फाटा येथे त्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच मागील काही काळापासून आपल्या सर्वांचे स्नेही दिपक भोरडे यांनी वायरमनच्या अनुपस्थित अतिशय प्रतिकूल परिस्थिमध्ये आपल्या गावांच्या विजेच्या प्रश्नासंबंधी नागरिक व शेतकऱ्यांना सहकार्य करून वेळोवेळी येणाऱ्या अडचणनींना सोडवले त्याबद्दल त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात आला.