हिंगणगाव ग्रामपंचायत गायरान जमिनीवर हातोडा
LoktantraNews24
प्रतिनिधी : हिंगणगाव ग्रामपंचायतच्या देखभालीसाठी ग्रामपंचायतच्या ताब्यात असणाऱ्या क्षेत्रावर स्थानिकांनी अतिक्रमण केले होते कित्येक वेळा ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थ यांनी तहसीलदार, प्रांत, जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन अतिक्रमण काढण्याची मागणी केली. त्या मागणीचा विचार करून हवेली तालुक्याच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी सुनावणी घेऊन अतिक्रमण काढण्याची विनंती केली.परंतु ज्या लोकांनी अतिक्रमण केले होते त्यांनी सांगून सुद्धा न ऐकल्याने शेवटी पोलीस बंदोबस्त जेसीबी च्या साह्याने अतिक्रमण काढण्यात आले.
यावेळी लोणीकंद पोलीस स्टेशनचे दोन कॉन्स्टेबल दोन महिला कॉन्स्टेबल, सर्कल अधिकारी गीताश्री काळे मॅडम, गाव कामगार तलाठी संजय गारकर,विद्यमान सरपंच शशिकला पोपळघट, उपसरपंच लंका वेताळ, सागर थोरात, सुरेश गायकवाड,दिपक कांबळे, कुंडलिक थोरात, अंकुश कोतवाल, दत्तात्रय वेताळ, काळूराम थोरात, संतोष काची व ग्रामस्थ अतिक्रमण काढण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते .
