शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मधील शाळा प्रवेशोत्सव
LoktantraNews24
प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलकवाडी या ठिकाणी उत्साहात साजरा झाला. प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे घेऊन, औक्षण करून , फुले ,फुगे ,चॉकलेट, पेन्सिल देऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिलीत दाखल सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, दप्तर, पाठ्यपुस्तके देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष कोतवाल यांनी सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.
पिंपरी सांडस चे माजी उपसरपंच मंगेश भाऊ गवारे व संचालक सुखदेव भाऊ भोरडे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना एकेका रोपाचे वाटप करण्यात आले व वृक्षारोपण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील मोडक यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. माजी उपसरपंच रामभाऊ शिंगटे यांनी शाळेतील सकारात्मक बदलासाठी सर्व शिक्षकांचे कौतुक करून मनोगत व्यक्त केले.
माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणपत गायकवाड, गणेश तोडकर, अतुल गायकवाड, चेअरमन संजय मांडे, युवा कार्यकर्ते अमोल लोणारी, आकाश लोणारी, चोरमले, महेंद्र श्रीराम, पंजाब घांगरे, गोपीनाथ भोरडे, वैभव लोणारी, अर्जुन शिंगटे, पुनम कंकरवाल, अर्चना तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका श्रीमती अश्विनी आव्हाळे, सहशिक्षक साहेबराव लोणारी, अंगणवाडी कार्यकर्त्या श्रीमती अनिता लोणारी, मदतनीस नूतन तोडकर यांनी केले.