आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

कल्लकवाडी येथे 76 वा गणराज्य दिन उत्साहात साजरा

LoktantraNews24

प्रतिनिधी : 26 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कल्लकवाडी येथे प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट रॉनी सलढाणा तर अध्यक्ष इंजिनीयर रॉजर सलढाना हे होते . पिंपरी सांडस ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश गवारे मा चेरमन सतिष भोरडे ,पत्रकार सुखदेव भोरडे ,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुनील मोडक, गणपत गायकवाड ,अष्टापुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच विनायक अर्जुन कोतवाल शाळेच्या मुख्याधापक अश्विनी कुटे . पल्लवी लोणारी . नूतन तोडकरआदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थी मनोगते ,बक्षिस वितरण, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. अष्टापुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच विनायक कोतवाल यांनी शाळेच्या रंगरंगोटीसाठी पाच हजार रुपये देणगी दिली. तसेच ॲडवोकेट रॉनी सलढाणा यांनी पाच हजार रुपये देणगी दिली. अध्यक्षांनी भाषणामधून शाळेच्या विकासा बद्दल कौतुक व्यक्त केले.पालक,ग्रामस्थ यांकडून मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी कार्यक्रमचे सूत्र संचालन व अभार प्रदर्शन साहेबराव लोणारी यानी केले.

संपादक: सुखदेव भोरडे

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.