विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे…. आप्पासाहेब जगदाळे
प्रतिनिधी:आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर तालुका हवेली येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अजिंक्य चॅरिटेबल उरुळी कांचन येथील कार्यकारी संचालक आप्पासाहेब जगदाळे उपस्थित होते. ते म्हणाले, या विद्यालयातील विद्यार्थी बुद्धिमान आहेत गेली अनेक वर्ष या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो हीच परंपरा तुम्ही सुद्धा अखंडपणे चालू ठेवावी. शाळेच्या जडणघडणीत सर्व विद्यार्थ्यांनी आपला खारीचा वाटा उचलावा व आपल्या शाळेचे नाव, गावाचे नाव उज्वल करावे. परीक्षेला सामोरे जात असताना मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आत्मविश्वासाने सामोरे जा तुम्हाला निश्चित यश मिळेल.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्रीहरी दादा कोतवाल उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे सहसचिव शिवाजीराव घोगरे, बाळासाहेब मुळीक हेही उपस्थित होते. संस्थेच्या वतीने त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी पायल कोतवाल, साहिल चौंडकर, आदित्य धारणे, श्रावणी निकाळजे या नववीतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.इयत्ता दहावीतील अस्मिता जमदाडे, साहिल कोतवाल ,ओंकार थोरात, यशराज कोतवाल ,कार्तिक रणसिंग, मानसी जगताप इत्यादी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील विविध आठवणी व्यक्त केल्या.ग्रामस्थांच्या वतीने स्कूल कमिटीचे सदस्य विजय कोतवाल सर यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीहरी दादा कोतवाल यांनीही शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जगताप यांनी प्रास्ताविकपर मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या शुभचिंतन प्रसंगी गावच्या सरपंच पुष्पाताई कोतवाल, सुरेश तात्या कोतवाल, स्कूल कमिटीचे सदस्य तयाजी बापू जगताप ,रमेश बापू कोतवाल ,विजय कोतवाल ,दिवाकर पिंगळे आदी ग्रामस्थ व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक बाळासाहेब ढवळे यांनी केले तर आभार सुहास भुजबळ यांनी मानले.