आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

दादा जाधवराव विद्यालयाचे घवघवीत यश 

प्रतिनिधी:जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती हवेली ,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि गणित व विज्ञान संघाच्या वतीने 52 वे हवेली तालुका विज्ञान प्रदर्शन 24 व 25 डिसेंबर रोजी गोल्डन सिएरा पब्लिक स्कूल कवडीपाट येथे पार पडले.                              हवेली तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रश्न मंजुषामध्ये अभिनव मित्र मंडळ संचलित,लोकनेते दादा जाधवराव माध्यमिक विद्यालय हिंगणगाव -शिंदेवाडी विद्यार्थ्यांनी मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळविला व लहान गटात द्वितीय क्रमांक मिळविला. मोठ्या गटात यश थोरात व ज्ञानेश्वर मोते तर छोट्या गटात सुमित भोई व गौरव पिंगळे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र पानसरे व विज्ञान शिक्षक विनायक वडघुले यांनी मार्गदर्शन केले. अजिंक्य चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव अजिंक्य कांचन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.                                                                             संस्थेचे अध्यक्ष विकास लवांडे व शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पानसरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

संपादक: सुखदेव भोरडे

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.