आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

बंधन संस्थेकडून निराधार महिलांना आधार

LoktantraNews24

प्रतिनिधी : बंधन संस्थेकडून निराधार महिलांना आधार सामाजिक संस्था बंधन संस्था ही निराधार महिलांना आधार देत असून या संस्थेकडून समाजातील गरजू व निराधार महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या संस्थेकडून मदत केली जाते ही संस्था गेली 2006 पासून काम करीत असून पुणे विभागामध्ये दहा शाखा काम करीत असून पिंपरी सांडस हद्दीतील अष्टापुर फाटा या ठिकाणी बंधन संस्थेकडून महिलांना शिलाई मशीन उपयुक्त कपडे किराणा या वस्तूचे वाटप करण्यात आले असून सुमारे पंधरा हजार रुपये किमतीचे साहित्य देण्यात आले. या ठिकाणी राहू येथील 40 महिलांना साहित्य देण्यात आले तर आष्टापूर फाटा या ठिकाणी सुद्धा काही महिलांना साहित्य देण्यात आले.आत्तापर्यंत दोन हजार महिलांना साहित्य वाटप करण्यात आल्याची माहिती बजाज कंपनीचे मॅनेजर सैफाली बजाज यांनी सांगितले. यावेळी कंपनीचे शुभम मित्तल, पूजा कांबळे ,अर्जीत दुत्ता ,भास्कर मुथया ,संजयदास उपस्थित होते.

संपादक: सुखदेव भोरडे

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.