आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाडे बोल्हाई येथील जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत..!!

मराठी विषयाने दहावीच्या परिक्षेस सुरुवात !

वाडे बोल्हाई : राज्यात आजपासून १0वी ची परीक्षा सुरू झाली आहे. यावेळी अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. वाडे बोल्हाई (ता.हवेली) येथील संत तुकाराम शिक्षण संस्था संचलित जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये १0वीची परीक्षेला विद्यार्थ्यांचे उत्सहात स्वागत करण्यात आले आहे.यावेळी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व विद्यार्थ्यंना शुभेच्छा देण्यात आले.विद्यार्थ्यांना कुठलाही ताण न होता मोकळ्या वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने पेपर देण्यात यावा, अशा शुभेच्छा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री कुशाभाऊ गावडे यांनी दिल्या आहेत.

शाळा समिती अध्यक्ष श्री विद्याधर गावडे, श्री गणेशजी हरगुडे माजी शाळा समिती अध्यक्ष केसनंद, श्री शिवाजी शिंदे, श्री भानुदास बहिरट, केंद्रप्रमुख धुमाळ सर, उपकेंद्रप्रमुख सौ देशमुख मॅडम , क्षीरसागर सर,श्री कोल्हे, श्री फलके सर, श्री दर्शन सर, श्री पवार सर, पल्लवी गायकवाड मॅडम, ढगे मामा, सवाई सर,नवले मॅडम, इंगळे मॅडम मेंगडे सर, पठारे मॅडम,,गायकवाड सर, कटके मॅडम, लांडे सर,कुदळ मॅडम,वेरूळकर प्राजक्ता,श्री वाघमारे सर,बोडके मॅडम, गायकवाड मॅडम किरण गायकवाड सर, भंडलकर मामा, विशाल रंधव, पोमण सर श्री गोगावले व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

वाडे बोल्हाई या ठिकाणी मराठी व सेमी इंग्रजी शिक्षण इयत्ता 1 ली ते 12 वी (कला, वाणिज्य व विज्ञान )पर्येंतच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व संस्थेचे सहसचिव अड दत्तात्रय काळे साहेब,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार विजेते श्री पंढरीनाथ तथा आण्णासाहेब पठारे व वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी वाडे बोल्हाई या ठिकाणी सन 2025-26 पासून वरिष्ठ महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय म्हणजे B. A., B. Com व B. Sci सुरु करण्याची शासनाची परवानगी मिळवली आहे.

संपादक: सुखदेव भोरडे

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.