शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरण्यास विरोध करावा -अंकुश कोतवाल
प्रतिनिधी:हवेली तालुक्यातील मुळा-मुठा नदीकाठच्या मांजरीखुर्द-मांजरी बु. पासून ते हिंगणगाव-खामगाव टेक पर्यंतच्या सर्व २२ गावांतील कृषीपंप धारकांना कळविण्यात येते की, पुणे शहाराच्या ड्रेनेज सांडपाण्यावर आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिला होता, त्यासंर्भात कार्यंकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग यांचेकडून दि. ०७/१२/२०२४ रोजी असमाधानकारक उत्तर प्राप्त झालेले आहे. निवेदन मागणीतील मुळ मुद्दा बाजुला ठेवून पाणी पट्टी आकारण्याचा तकादा सुरु ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने हवेली तालुक्यातील मुळा मुठा काठच्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की, कुणीही पाणीपट्टी भरु नये व पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना नोटीसीची मागणी करावी. तसेच लवकरच याबाबत कृती समितीची बैठक घेवून पुढील निर्णय घेण्यासाठी व दिशा ठरविण्यासाठी शेतकरी मेळावा आयोजीत केला जाईल.